१०. उद्योजक
१०. उद्योजक जो व्यक्ती चांगल्या मार्गाने नफा कमावण्यासाठी उद्योग करतो त्याला उद्योजक म्हणतात. उद्योजकाला समानार्थी शब्द व्यावसायिक, उद्यमी इत्यादी आहेत. उद्योजक नफा कमावण्यासाठी पैसे, मशीनरी, मनुष्यबळ इत्यादी गोष्टींचा वापर करतो. अशा उद्योगातून इतरही लोकांना रोजगार मिळतो. बरेच उद्योजक उद्योग सुरु करण्यासाठी बँकाकडून कर्ज घेतात आणि ठरलेल्या कालावधीत परतफेड करतात. त्यामुळे बँकांना सुद्धा उद्योजकामुळे चांगला फायदा होतो. काही उद्योजक आणि त्यांचा उद्योग इतर उद्योगांना कर्जपुरवठा करतात. कर्जपुरवठा हा सुद्धा एक उद्योग आहे. काही उद्योजक एजन्ट च्या रूपाने सुध्या काम करतात आणि फायदा कमावतात. उद्योगात नोकरी भेटलेल्या लोकांना मुबलक पैसे मिळत असल्यामुळे त्यांची खर्च करण्याची ताकद वाढते. त्यामुळे पैसा बाजारात चांगला फिरतो. चांगले उद्योजक अर्थ व्यवस्थेला मजबूत करतात. एकूणच काय तर उद्योजक आणि त्यांच्या उद्योगामुळेचा विकास होण्यास मदत होते. उद्योजकांचे प्रकार १. उत्पादन उद्योजक: जो उद्योजक समाजाच्या आणि इतर उद्योगांच्या गरज ओळखून समाजउपयोगी आणि समाजहितासाठी वस्तूंची निर्मिती करू...