७. सेवा उद्योग
७. सेवा उद्योग
उद्योगांच्या या मुख्य प्रकारांपैकी सेवा उद्योग हा एक महत्वाचा प्रकार आहे. नफा कमावण्यासाठी कोणत्याही सेवेला धंदा म्हणून काम केले तर त्या उद्योगाला सेवा उद्योग म्हणता येईल. उदा. विमा उद्योग, रिअल इस्टेट एजंटचा धंदा, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपन्या, टॅक्स सल्लागार, बांधकाम सल्लागार, डॉक्टर व्यवसाय असे अनेक व्यवसाय या प्रकारात येतात. ज्या धंद्यात कोणत्याही वस्तूची निर्मिती किंवा विक्री न करता फक्त सेवा पुरवली जाते तो सेवा उद्योग. थोडक्यात या धंद्यात सेवा विकून फायदा कमावला जातो.
या व्यवसायात काही उद्योजक एकटेच काम करतात, काहीजण एकत्र काम करतात तर LIC सारख्या खूप मोठ्या संस्था देखील मोठा नफा कमावतात. लहान व्यवसायातून सुरु करून उद्योजकांनी हळूहळू धंद्याच्या भविष्याचा अंदाज घेत भविष्यात सुद्धा धंद्यातून नफा येणार असेल तर उद्योजकांनी धंदा मोठा करावा. नाहीतर नफा जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर धंद्यात मोठी गुंतवणूक करू नये कमी नफ्यात सुद्धा आरामात जीवन जगात येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा