४. दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय सुरु करा

 ४.     दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय सुरु करा


उद्योजक मंडळीनो तुमची आर्थिक घडी मजबूत असेल म्हणजे तुमच्याकडे मजबूत पैसा असेल तर तुम्हाला दुसऱ्या मार्गाने जायचे आहे. तो म्हणजे उद्योग व्यवसायाचा अभ्यास करून नियोजन करावे, वेगवेगळ्या धंद्यासाठी वेगवेगळी माहिती आणि पक्के ज्ञान आवश्यक आहे मग अशा धंद्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा घ्यावे लागेल. नंतरच धंद्यात उडी मारावी.


मंडळी,


मला वाटतं उद्योग-व्यवसायावरचं माझं पुस्तक हे जगातील सर्वात छोटं पुस्तक आहे. हे पुस्तक आत्ताच्या आता धंदा सुरु करणाऱ्या उद्योजक मंडळींसाठी फार उपयोगी आहे. कोणतंही वेडं वाकडं वळण न घेता मी तुम्हाला सोप्या शब्दात धंद्याची सुरुवात कशी करावी याची माहिती दिली आहे. तुमचा धंदा एकदा स्थिर झाला कि मग माझे पुढचे पुस्तक वाचा आणि तुमच्या सध्याच्या चालू धंद्याला मोठं करा. बाकी अभ्यासपूर्वक ज्या मंडळींना धंदा सुरु करायचा आहे त्यांनी सुद्धा माझे या पुस्तकानंतर दुसरे पुस्तक वाचावे.


मंडळी आता थांबू आपण पुढची भेट लवकरच होईल.


तुम्ही वेळ काढून हे पुस्तक वाचले त्याबद्दल धन्यवाद. 


नवीन उद्योजक मंडळींनी व्यवसाय सुरु केला आहे त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

३. पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा

१. आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा