१०. उद्योजक
१०. उद्योजक
जो व्यक्ती चांगल्या मार्गाने नफा कमावण्यासाठी उद्योग करतो त्याला उद्योजक म्हणतात. उद्योजकाला समानार्थी शब्द व्यावसायिक, उद्यमी इत्यादी आहेत. उद्योजक नफा कमावण्यासाठी पैसे, मशीनरी, मनुष्यबळ इत्यादी गोष्टींचा वापर करतो. अशा उद्योगातून इतरही लोकांना रोजगार मिळतो. बरेच उद्योजक उद्योग सुरु करण्यासाठी बँकाकडून कर्ज घेतात आणि ठरलेल्या कालावधीत परतफेड करतात. त्यामुळे बँकांना सुद्धा उद्योजकामुळे चांगला फायदा होतो. काही उद्योजक आणि त्यांचा उद्योग इतर उद्योगांना कर्जपुरवठा करतात. कर्जपुरवठा हा सुद्धा एक उद्योग आहे. काही उद्योजक एजन्ट च्या रूपाने सुध्या काम करतात आणि फायदा कमावतात. उद्योगात नोकरी भेटलेल्या लोकांना मुबलक पैसे मिळत असल्यामुळे त्यांची खर्च करण्याची ताकद वाढते. त्यामुळे पैसा बाजारात चांगला फिरतो. चांगले उद्योजक अर्थ व्यवस्थेला मजबूत करतात. एकूणच काय तर उद्योजक आणि त्यांच्या उद्योगामुळेचा विकास होण्यास मदत होते.
उद्योजकांचे प्रकार
१. उत्पादन उद्योजक:
जो उद्योजक समाजाच्या आणि इतर उद्योगांच्या गरज ओळखून समाजउपयोगी आणि समाजहितासाठी वस्तूंची निर्मिती करून नफा कमावतो त्याला उत्पादन उद्योजक असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तूंचे छोटे मोठे अनेक कारखाने आहेत या सगळ्यांचे मालक हे उत्पादन उद्योजक आहेत. उदा. बांधकाम विटा तयार करण्याचा कारखाना, चॉकलेट बनवण्याचा कारखाना, वाहन उद्योग, इ.
२. सेवा उद्योजक:
जो उद्योजक समाजाच्या आणि इतर उद्योगांच्या गरज ओळखून समाजउपयोगी आणि समाजहितासाठी सेवा करून नफा कमावतो त्याला सेवा उद्योजक असे म्हणतात. उदा. लेबर कॉन्ट्रॅक्टर, विमा कंपन्या, रिअल इस्टेट एजंट, इ.
३. व्यापारी उद्योजक:
जो उद्योजक समाजाच्या आणि इतर उद्योगांच्या गरज ओळखून समाजउपयोगी आणि समाजहितासाठी व्यापार करून नफा कमावतो त्याला व्यापारी उद्योजक असे म्हणतात. उदा. फळांचे व्यापारी, वाहनांचे शोरूम, कपड्यांचे व्यापारी, इ.
४. शेती उद्योजक:
जो उद्योजक समाजाच्या आणि इतर उद्योगांच्या गरज ओळखून समाजउपयोगी आणि समाजहितासाठी शेतीतुन उत्पादन घेऊन नफा कमावतो त्याला शेती किंवा शेतकरी उद्योजक उद्योजक असे म्हणतात. एक गोष्ट इथं समजून घ्यावी लागेल शेती आपण उद्योग धंदा असं समजून केली तर तो तो शेती उद्योग १००% यशस्वी होईल. पण आपण हिशोबी न राहता शेती केली तर ती पोट भरण्याचे साधन किंवा समाजसेवा असणार आहे. त्यामुळे शेती करताना हिशोबी राहून धंदा करावा लागेल. शेतकरी हा उत्पादन उद्योजक सुद्धा आहे. पण शेती हा खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते म्हणून आपल्याला शेतकरी हा उद्योजकांचा नवीन प्रकार विचारात घेता येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा