पोस्ट्स

१०. उद्योजक

१०. उद्योजक   जो व्यक्ती चांगल्या मार्गाने नफा कमावण्यासाठी उद्योग करतो त्याला उद्योजक म्हणतात. उद्योजकाला समानार्थी शब्द व्यावसायिक, उद्यमी इत्यादी आहेत. उद्योजक नफा कमावण्यासाठी पैसे, मशीनरी, मनुष्यबळ इत्यादी गोष्टींचा वापर करतो. अशा उद्योगातून इतरही लोकांना रोजगार मिळतो. बरेच उद्योजक उद्योग सुरु करण्यासाठी बँकाकडून कर्ज घेतात आणि ठरलेल्या कालावधीत परतफेड करतात. त्यामुळे बँकांना सुद्धा उद्योजकामुळे चांगला फायदा होतो. काही उद्योजक आणि त्यांचा उद्योग इतर उद्योगांना कर्जपुरवठा करतात. कर्जपुरवठा हा सुद्धा एक उद्योग आहे. काही उद्योजक एजन्ट च्या रूपाने सुध्या काम करतात आणि फायदा कमावतात. उद्योगात नोकरी भेटलेल्या लोकांना मुबलक पैसे मिळत असल्यामुळे त्यांची खर्च करण्याची ताकद वाढते. त्यामुळे पैसा बाजारात चांगला फिरतो. चांगले उद्योजक अर्थ व्यवस्थेला मजबूत करतात. एकूणच काय तर उद्योजक आणि त्यांच्या उद्योगामुळेचा  विकास होण्यास मदत होते. उद्योजकांचे प्रकार  १.  उत्पादन उद्योजक: जो उद्योजक समाजाच्या आणि इतर उद्योगांच्या गरज ओळखून समाजउपयोगी आणि समाजहितासाठी वस्तूंची निर्मिती करू...

९. उत्पादन उद्योग

९. उत्पादन उद्योग ज्या धंद्यात प्रत्यक्ष वस्तूंची निर्मिती केली जाते त्याला उत्पादन उद्योग म्हणतात. या धंद्यात तुम्हाला स्वतः गुंतवणूक करावी लागते. वस्तू तयार करून ती विकण्यापर्यंत जेवढा खर्च येतो त्यापेक्षा त्याची विक्रीची किंमत थोडी जास्त ठेवली जाते. हा किमतीतील फरक म्हणजेच उत्पादन उद्योगातील नफा. या धंद्यामध्ये तुम्हाला बाजारपेठेची सर्व माहिती असायला हवी. तरच तुम्ही बाजारात टिकू शकाल. या बाजारात घुसण्यासाठी तुम्हाला अगोदर त्याच वस्तूचा व्यापार करावा लागेल. व्यापार करताना तुम्हाला तुम्ही तयार करणाऱ्या वस्तूच्या उत्पादनाविषयी आणि बाजारपेठेविषयी सर्वच माहिती मिळेल. त्यामुळे तुमचा वस्तू तयार करण्याविषयीची निर्णय पक्का होईल. या जगातील बाजारपेठेतील तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तू ही उत्पादन उत्पादन उद्योगाची उदाहरणे आहेत . 

८. व्यापार उद्योग

८. व्यापार उद्योग मंडळी तुमच्या नवीन धंद्याची सुरुवात व्यापारातूनच झाली पाहिजे. या उद्योगात आपण कमी रेटमध्ये म्हणजेच होलसेल रेटमध्ये माल किंवा सेवा खरेदी करायची आहे आणि बाजारभावाने ती विकायची आहे. या धंद्यात खरेदीची किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त असल्यामुळे किमतीमधील फरक हाच तुमचा फायदा असेल. सुरुवातीला हा नफा कमी असू शकतो पण धंद्यातील बारकावे तुमच्या लक्षात आल्यामुळे हळूहळू तुमच्या नफ्यात वाढ होईल. नवीन धंद्याची सुरुवात व्यापारातून करण्याचे फायदे: १. तुम्हाला ज्या वस्तूची किंवा सेवेचा उद्योग उभा करायचा आहे त्याचा व्यापार किंवा सेवेचा व्यापार तुम्हाला सुरु करता येईल.   २. तुम्हाला त्या वस्तू किंवा सेवेच्या बाजारात घुसण्याचा हा एकदम सोपा मार्ग आहे.  ३. एकदा का तुम्ही बाजारात घुसला कि बाजारातील तुम्ही करू इच्छित असलेल्या धंद्याविषयी बारीक  सारीक सगळी माहिती तुमच्या समोर येईल.  ४. तुमच्या हेही ध्यानात येईल कि खरंच आपल्याला जो मोठा धंदा करायचा आहे त्या धंद्यात खरंच फायदा आहे कि नाही. जर त्या धंद्यात फायदा नसेल तर त्या धंद्याच्या तुम्ही नादी लागू नका. ५. आणि त्या ध...

७. सेवा उद्योग

  ७. सेवा उद्योग उद्योगांच्या या मुख्य प्रकारांपैकी सेवा उद्योग हा एक महत्वाचा प्रकार आहे. नफा कमावण्यासाठी कोणत्याही सेवेला धंदा म्हणून काम केले तर त्या उद्योगाला सेवा उद्योग म्हणता येईल. उदा. विमा उद्योग, रिअल इस्टेट एजंटचा धंदा, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपन्या, टॅक्स सल्लागार, बांधकाम सल्लागार, डॉक्टर व्यवसाय असे अनेक व्यवसाय या प्रकारात येतात. ज्या धंद्यात कोणत्याही वस्तूची निर्मिती किंवा विक्री न करता फक्त सेवा पुरवली जाते तो सेवा उद्योग. थोडक्यात या धंद्यात सेवा विकून फायदा कमावला जातो. या व्यवसायात काही उद्योजक एकटेच काम करतात, काहीजण एकत्र काम करतात तर LIC सारख्या खूप मोठ्या संस्था देखील मोठा नफा कमावतात. लहान व्यवसायातून सुरु करून उद्योजकांनी हळूहळू धंद्याच्या भविष्याचा अंदाज घेत भविष्यात सुद्धा धंद्यातून नफा येणार असेल तर उद्योजकांनी धंदा मोठा करावा. नाहीतर नफा जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर धंद्यात मोठी गुंतवणूक करू नये कमी नफ्यात सुद्धा आरामात जीवन जगात येते.

६. उद्योग

६. उद्योग   या शब्दाची व्याख्याच खूप विस्तारित आहे. उद्योगाला बोली भाषेत धंदा, व्यवसाय, असेही बोलले जाते. उद्योगाची व्याख्या: नफा कमावण्यासाठी चांगल्या मार्गाने केलेले काम म्हणजे उद्योग(धंदा, व्यवसाय). हि मी केलेली सरळ व्याख्या आहे. बाकी इतरही मंडळींनी व्याख्या सांगितलेल्या आहे त्यासुद्धा बरोबर आहेत. पण माझ्या सामान्यातल्या सामान्य उद्योजकाला समजणारी सोपी व्याख्या हीच आहे. असो, शेवटी नफा हा उद्योगाचा मूळ उद्द्येश आहे. नफा हा कोणत्याही धंद्यातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. उद्योगाचे प्रकार: उद्योगाचे प्रमुख तीन प्रकार आहे.  १. सेवा उद्योग  २. व्यापार उद्योग  ३. उत्पादन उद्योग जगातील प्रत्येक धंदा वर सांगितलेल्या कोणत्याही एखाद्या प्रकारात येतोच. अनेक हुशार मंडळींनी आपापल्या परीने अनेक प्रकार वाढवले आहेत. पण शेवटी सगळ्या उद्योगातून नफाच कमवायचा आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचे आहे. आणि आपल्याला समजेल त्या पुस्तकातून धंदा समजून घ्यायचा आहे.   उद्योगाचे मुख्य प्रकार आपण पुढच्या प्रकरणात व्यवस्थित समजून घेऊ.  

५. धंदा हा एकच पर्याय

मंडळी, जीवनाच्या या टप्प्यावर आपल्याला उद्योग धंदा हा एकच पर्याय आहे. आपल्याला उद्योजक या आपल्या भूमिकेमुळे जीवनातील अनेक गोष्टींचा उत्तम लाभ आपल्याला मिळत आहेत.  आपल्या कामाच्या वेळा अनिश्चित आहेत. आपल्या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात तर आपल्याला दिवस रात्र कष्ट करावे लागणार आहे. त्यामुळे जेवढे कष्ट जास्त तेवढा फायदासुद्धा भरपूर मिळणार आहे. आपले दररोजचे काम नेहमी वेगवेगळे असणार आहे कारण सुरुवातीच्या काळात तुमच्या धंद्याचा मालक, नोकर, ड्राइवर, अकांउंटंट, इंजिनिअर, हेल्पर हे फक्त तुम्हीच असणार आहेत. तुमच्या धंद्यात धोका जरी जास्त असला तर नफा सुद्धा मजबूत आहे. म्हणतात ना रिस्क है तो इश्क है....  तुम्हाला आणि तुमच्या धंद्याला वाढवण्यासाठी अमर्याद संधी आहेत. आपल्या धंद्यात तुमच्या नशिबाचे तुम्ही मालक आहात. तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. तुम्हाला स्वातंत्र्य आहे. शेवटी तुम्हाला मिळणारा नफा, मानसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहेत.

४. दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय सुरु करा

  ४.       दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय  सुरु करा उद्योजक मंडळीनो तुमची आर्थिक घडी मजबूत असेल म्हणजे तुमच्याकडे मजबूत पैसा असेल तर तुम्हाला दुसऱ्या मार्गाने जायचे आहे. तो म्हणजे उद्योग व्यवसायाचा अभ्यास करून नियोजन करावे, वेगवेगळ्या धंद्यासाठी वेगवेगळी माहिती आणि पक्के ज्ञान आवश्यक आहे मग अशा धंद्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा घ्यावे लागेल. नंतरच धंद्यात उडी मारावी. मंडळी, मला वाटतं उद्योग-व्यवसायावरचं माझं पुस्तक हे जगातील सर्वात छोटं पुस्तक आहे. हे पुस्तक आत्ताच्या आता धंदा सुरु करणाऱ्या उद्योजक मंडळींसाठी फार उपयोगी आहे. कोणतंही वेडं वाकडं वळण न घेता मी तुम्हाला सोप्या शब्दात धंद्याची सुरुवात कशी करावी याची माहिती दिली आहे. तुमचा धंदा एकदा स्थिर झाला कि मग माझे पुढचे पुस्तक वाचा आणि तुमच्या सध्याच्या चालू धंद्याला मोठं करा. बाकी अभ्यासपूर्वक ज्या मंडळींना धंदा सुरु करायचा आहे त्यांनी सुद्धा माझे या पुस्तकानंतर दुसरे पुस्तक वाचावे. मंडळी आता थांबू आपण पुढची भेट लवकरच होईल. तुम्ही वेळ काढून हे पुस्तक वाचले त्याबद्दल धन्यवाद.  नवीन उद्यो...

३. पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा

३.     पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा पहिला मार्ग हा एकदम वेगवान मार्ग आहे. याचा एकच मंत्र आहे - आत्ताच्या आत्ता धंदा सुरु करा. माझ्या या लेखनाचा सर्वात मोठा हेतू इथेच आहे. बऱ्याच मंडळींच्या मनात हाच प्रश्न आहे ना आत्ताच्या आता धंदा कसा काय सुरु करायचा? आणि या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी मी इथं अनेक उदाहरणे देतो.  उदाहरण १. तुमच्याकडे धंदा करण्यासाठी भांडवल म्हणजे पैसे असतील तर- ज्या धंद्यात तुम्हाला नफा दिसतोय तोच धंदा तुम्ही सुरु करायचा. आणि त्या धंद्याची तुम्हाला आवड देखील असायला हवी. अशा धंद्यात तुमचा पैसा वापरून एकतर तुम्ही व्यापार करा म्हणजे होलसेल बाजारातून कमी रेट मध्ये माल खरेदी करा आणि तो माल जवळच्या बाजारात बाजारभावाने कस्टमरला विका. समजा कपड्यांचा व्यापार तुम्हाला करायचा आहे तर होलसेल बाजारातून कमी रेट मध्ये कपडे खरेदी करा आणि डायरेक्ट कस्टमरला बाजारभावाने विका. धंदा करताना तुम्ही लाजायचे नाही कारण तुम्हाला मानसन्मानाने जीवन जगायचे असेल तर तुम्हाला पैसे स्वतः कमवायला हवेत. मग मानसन्मानाने व्यवसाय करा. आणि निवांत जीवनप्रवास ...

२. उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचे दोनच मार्ग

२.  उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचे दोनच मार्ग   अनेक वर्षांच्या माझ्या व्यावसायिक वाटचालीनंतर मी तुम्हाला धंदा सुरु करण्याचे सोपे आणि पक्के मार्ग नक्की सांगू शकतो. पहिला मार्ग आहे तो म्हणजे - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा. याचे कारण म्हणजे उद्योग धंदा सुरु करण्यासाठी आपली मंडळी बराच वेळ लावतात. आज तंत्रज्ञानाचे युग आहे. सगळ्याच गोष्ट वेगवान झाल्या आहेत. तुमचा धंदा सुरु करण्याचा विचार पक्का झाला असेल तर तो आता आणि आजच सुरु करू. एवढा वेळ आपण फक्त विचार करण्यात खर्च केला आहे. आता वेळ आहे ती सुरु करण्याची. दुसरा मार्ग म्हणजे आपण उद्योग धंद्याच्या एकूणच वाटचालीचा अभ्यास करून अंदाज घ्यायचा आहे. एकदा तुमचे नियोजन पक्के झाले कि मग श्रीगणेशा करा.

१. आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा

 १.       आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा नमस्कार उद्योजक मंडळी. तुम्हाला उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी एकाच गोष्ट आत्ता करावी लागेल. आणि ती गोष्ट म्हणजे तुम्हाला आवडलेला उद्योग-व्यवसाय आत्ताच सुरु करा. तुम्ही जीवन प्रवास सोपा होण्यासाठी कोणतेही कार्य सध्या करत असाल आणि यातून मार्ग काढून तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. तुम्ही खालील पैकी कोणत्याही कार्यात गुंतलेले असू द्यात ...  १. तुम्ही नोकरी करत असाल २. तुम्ही समाज कार्यात असाल  ३. तुम्ही रिकामे आहात आणि नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत असाल ४. किंवा तुम्ही सध्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात गुंतलेले असाल  यातूनच उद्योग व्यवसायाचा मार्ग निवडून आपल्याला तो आत्ताच्या आता सुरु करायचा आहे. १. नोकरदार मंडळी नोकरदार मंडळींनी अशी सुरुवात करावी. तुम्ही नोकरी करीत आहात आणि समजा तुमच्यावर खूप मोठं कर्ज असेल तर सर्वप्रथम तुम्ही नोकरी सुरक्षित ठेऊन सुटीच्या दिवशी उद्योग व्यवसाय सुरु करा. काही रुपयांमध्ये किंवा काही हजारांमध्ये छोटीशी गुंतवणूक तुम्हाला नफा मिळेल अशा धंद्यात कराव...

अनुक्रमणिका

  अनुक्रमणिका   अ. क्र. १.      आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा  २.      आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचे दोनच मार्ग ३.      पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा    ४.      दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय  सुरु करा ५.       धंदा हा एकच पर्याय ६.     उद्योग ७.     सेवा उद्योग  

झेप माझी आणि माझ्या उद्योगाची!

झेप माझी आणि माझ्या उद्योगाची! राम राम उद्योजक मंडळी! उद्योग व्यवसायाचा पहिला विचार ते पहिला निव्वळ नफा हा रोमांचकारी जीवन प्रवास तुम्हाला जगायचा आणि अनुभवायचा असेल तर या मंचावर आपले स्वागत आहे. तुम्ही जीवनात यापुढे फक्त उद्योगच करायचा असा ध्यास घेतला असेल तर हा प्रवास तुम्हाला फार आरामदायी वाटेल. पण अजून तुम्ही उद्योग करायचा फक्त विचार करत असाल तर तुमचा निर्णय पक्का करण्यासाठी  माझे हे व्यासपीठ तुम्हाला मदत करेल. नोकरदार मंडळी साठी हा प्रवास कंटाळवाणा वाटेल.  कृपया आपली भूमिका पक्की झाल्यानंतर या प्रवासात सामील व्हा. तर उद्योजक मंडळी या मंचावर आपले स्वागत आहे.