५. धंदा हा एकच पर्याय
मंडळी, जीवनाच्या या टप्प्यावर आपल्याला उद्योग धंदा हा एकच पर्याय आहे. आपल्याला उद्योजक या आपल्या भूमिकेमुळे जीवनातील अनेक गोष्टींचा उत्तम लाभ आपल्याला मिळत आहेत. आपल्या कामाच्या वेळा अनिश्चित आहेत. आपल्या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात तर आपल्याला दिवस रात्र कष्ट करावे लागणार आहे. त्यामुळे जेवढे कष्ट जास्त तेवढा फायदासुद्धा भरपूर मिळणार आहे.
- आपले दररोजचे काम नेहमी वेगवेगळे असणार आहे कारण सुरुवातीच्या काळात तुमच्या धंद्याचा मालक, नोकर, ड्राइवर, अकांउंटंट, इंजिनिअर, हेल्पर हे फक्त तुम्हीच असणार आहेत.
- तुमच्या धंद्यात धोका जरी जास्त असला तर नफा सुद्धा मजबूत आहे. म्हणतात ना रिस्क है तो इश्क है....
- तुम्हाला आणि तुमच्या धंद्याला वाढवण्यासाठी अमर्याद संधी आहेत.
- आपल्या धंद्यात तुमच्या नशिबाचे तुम्ही मालक आहात.
- तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.
- तुम्हाला स्वातंत्र्य आहे.
शेवटी तुम्हाला मिळणारा नफा, मानसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा