६. उद्योग
६. उद्योग
या शब्दाची व्याख्याच खूप विस्तारित आहे. उद्योगाला बोली भाषेत धंदा, व्यवसाय, असेही बोलले जाते.
उद्योगाची व्याख्या: नफा कमावण्यासाठी चांगल्या मार्गाने केलेले काम म्हणजे उद्योग(धंदा, व्यवसाय). हि मी केलेली सरळ व्याख्या आहे. बाकी इतरही मंडळींनी व्याख्या सांगितलेल्या आहे त्यासुद्धा बरोबर आहेत. पण माझ्या सामान्यातल्या सामान्य उद्योजकाला समजणारी सोपी व्याख्या हीच आहे. असो, शेवटी नफा हा उद्योगाचा मूळ उद्द्येश आहे. नफा हा कोणत्याही धंद्यातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे.
उद्योगाचे प्रकार: उद्योगाचे प्रमुख तीन प्रकार आहे.
१. सेवा उद्योग
२. व्यापार उद्योग
३. उत्पादन उद्योग
जगातील प्रत्येक धंदा वर सांगितलेल्या कोणत्याही एखाद्या प्रकारात येतोच. अनेक हुशार मंडळींनी आपापल्या परीने अनेक प्रकार वाढवले आहेत. पण शेवटी सगळ्या उद्योगातून नफाच कमवायचा आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचे आहे. आणि आपल्याला समजेल त्या पुस्तकातून धंदा समजून घ्यायचा आहे.
उद्योगाचे मुख्य प्रकार आपण पुढच्या प्रकरणात व्यवस्थित समजून घेऊ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा