३. पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा
३. पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा
पहिला मार्ग हा एकदम वेगवान मार्ग आहे. याचा एकच मंत्र आहे - आत्ताच्या आत्ता धंदा सुरु करा. माझ्या या लेखनाचा सर्वात मोठा हेतू इथेच आहे. बऱ्याच मंडळींच्या मनात हाच प्रश्न आहे ना आत्ताच्या आता धंदा कसा काय सुरु करायचा? आणि या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी मी इथं अनेक उदाहरणे देतो.
उदाहरण १.
तुमच्याकडे धंदा करण्यासाठी भांडवल म्हणजे पैसे असतील तर-
ज्या धंद्यात तुम्हाला नफा दिसतोय तोच धंदा तुम्ही सुरु करायचा. आणि त्या धंद्याची तुम्हाला आवड देखील असायला हवी. अशा धंद्यात तुमचा पैसा वापरून एकतर तुम्ही व्यापार करा म्हणजे होलसेल बाजारातून कमी रेट मध्ये माल खरेदी करा आणि तो माल जवळच्या बाजारात बाजारभावाने कस्टमरला विका. समजा कपड्यांचा व्यापार तुम्हाला करायचा आहे तर होलसेल बाजारातून कमी रेट मध्ये कपडे खरेदी करा आणि डायरेक्ट कस्टमरला बाजारभावाने विका. धंदा करताना तुम्ही लाजायचे नाही कारण तुम्हाला मानसन्मानाने जीवन जगायचे असेल तर तुम्हाला पैसे स्वतः कमवायला हवेत. मग मानसन्मानाने व्यवसाय करा. आणि निवांत जीवनप्रवास करा.
उदाहरण २.
तुमच्याकडे धंदा करण्यासाठी भांडवल म्हणजे एकही पैसा नसेल तर-
अशा परिस्थितही तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर तुम्ही जो धंदा करायचा आहे त्याच उद्योगाच्या बाजारपेठेत त्याच मालाच्या दुकानात काही दिवस काम करा. हळूहळू पैसे साठवा आणि नंतर स्वतःचा धंदा सुरु करू. कोणताही धंदा करताना लाजू आणि माजू नका. बर तुम्हाला आता कसल्याही दुकानात कंपनीत कामच करायचे नसेल तर तुम्ही कमिशन वर तेथेच धंदा सुरु करा. अशा कंपनीत किंवा दुकानात जाऊन मालकाला सरळ विचार कि मी तुमचा माळ विकण्यासाठी मदत करतो तर मला कमिशन किती भेटेल? तुम्हाला सुरुवातीला जास्त कष्ट करावे लागतील नंतर मात्र तुम्हाला भरपूर पैसा भेटेल. मग तुम्ही हळूहळू पैसे साठवा आणि भांडवल उभारणी करा. आणि याच भांडवलाच्या जोरावर तुम्ही धंदा वाढवू शकता.
३. पार्टनरशिप मध्ये धंदा
धंद्याची आयडिया तुमची आणि पैसा पार्टनरचा!
तुमच्याकडे भांडवलाची कमतरता असेल तर तुम्ही पार्टनरशिपमध्ये धंदा सुरु करू शकता. पार्टनरशिपच्या धंद्याचा शेवट हा भांडणातच होतो. पण पार्टनरशिप चा धंदा धंद्यासारखा केला तर मात्र नक्कीच यश मिळेल आणि तुम्ही नफा कमवून धंद्यातून बाहेर पडू शकता. हा धंदा बराच धोकादायक आहे. विचार करूनच या भानगडीत पडा.
वरील उदाहरणातून तुम्हाला नक्की लक्षात आले असेल कि तुमच्याकडे उद्योग-धंदा करण्यासाठी भांडवल असो वा नसो तुम्ही तुमचा धंदा नक्कीच सुरु करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा