१. आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा
१. आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा
नमस्कार उद्योजक मंडळी. तुम्हाला उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी एकाच गोष्ट आत्ता करावी लागेल. आणि ती गोष्ट म्हणजे तुम्हाला आवडलेला उद्योग-व्यवसाय आत्ताच सुरु करा. तुम्ही जीवन प्रवास सोपा होण्यासाठी कोणतेही कार्य सध्या करत असाल आणि यातून मार्ग काढून तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. तुम्ही खालील पैकी कोणत्याही कार्यात गुंतलेले असू द्यात ...
१. तुम्ही नोकरी करत असाल
२. तुम्ही समाज कार्यात असाल
३. तुम्ही रिकामे आहात आणि नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत असाल
४. किंवा तुम्ही सध्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात गुंतलेले असाल
यातूनच उद्योग व्यवसायाचा मार्ग निवडून आपल्याला तो आत्ताच्या आता सुरु करायचा आहे.
१. नोकरदार मंडळी
नोकरदार मंडळींनी अशी सुरुवात करावी. तुम्ही नोकरी करीत आहात आणि समजा तुमच्यावर खूप मोठं कर्ज असेल तर सर्वप्रथम तुम्ही नोकरी सुरक्षित ठेऊन सुटीच्या दिवशी उद्योग व्यवसाय सुरु करा. काही रुपयांमध्ये किंवा काही हजारांमध्ये छोटीशी गुंतवणूक तुम्हाला नफा मिळेल अशा धंद्यात करावी. आलेल्या नफ्यातून तुमचा पगार सर्वप्रथम काढून घ्या. राहिलेला नफा पुन्हा व्यवसायात गुंतवा. असं करून धंदा वाढवत न्या. ज्यादिवशी तुमच्यावर असलेल्या कर्जाच्या हफ्त्याएवढा आणि तुमचे घर कुटुंब व्यवस्थित सुरु राहील एवढा नफा तुम्हाला दर महिन्याला मिळू लागेल त्यादिवशी तुम्ही नोकरीचा राजीनामा द्या. आणि पूर्णवेळ व्यवसाय सुरु करा. हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आता समजा तुम्ही नोकरी करीत आहात आणि तुमच्यावर छोटं कर्ज असेल तर तुम्ही पार्ट टाइम म्हणजे अर्धवेळ नोकरी करा आणि अर्धवेळ व्यवसाय करा. तुमच्या पगाराएवढा नफा तुम्हाला भेटू लागला कि त्यादिवशी तुम्ही नोकरीचा राजीनामा द्या. समजा तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि कोणतेही आर्थिक जबाबदारी तुमच्यावर नाही तर आताच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करा.
२. समाजकार्यात व्यस्त असणाऱ्या मंडळींसाठी
समाजकार्य हे दैवी कार्य आहे. समाजकार्यातून किती नफा मिळतो याची तुम्हाला कल्पना आहे. तुम्हाला जर समाजकार्य सोडून उद्योग व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही मंडळी जरा सावधान व्हा. कारण समाजकार्यातून मिळणारा पैसा आणि उद्योग-धंद्यातून मिळणाऱ्या नफ्यात फरक आहे. तुम्ही मंडळींनी धंदा सुरु करताना तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला तुमचा स्वभाव नफेखोर बनवावा लागेल. कारण ज्या धंद्यात नफा मिळत आहे तोच व्यवसाय आपल्याला करायचा आहे. आणि ज्या धंद्यात तुम्हाला स्पष्ट नफा दिसत नाही तो धंदा तुम्ही अजिबात करायचा नाही. कारण असा धंदा तुम्हाला परत समाजकार्याकडे घेऊन जाईल आणि तुम्ही परत त्याच ठिकाणी याल. हि काळजी तुम्ही घ्यायची आहे.
३. तुम्ही रिकामे आहात आणि नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत असाल
पहिली गोष्ट म्हणजे ज्या धंद्यात नफा तुम्हाला स्पष्टपणे दिसतो तोच व्यवसाय तुम्हाला करायचा आहे. अशा उद्योग-व्यवसायाची तुम्हाला आवड देखील पाहिजे. तुम्ही असा धंदा आत्ताच सुरु करू शकता.
४. तुम्ही सध्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात गुंतलेले असाल
आपल्यापैकी बरीच उद्योजक मंडळी ते सध्या करीत असलेल्या धंद्यात अडकलेले दिसतात. तुमच्यासाठी प्रगतीचे बरेच मार्ग आहेत. आपण मंडळींनी चांगला नफा मिळत असलेलाच धंदा करायचा आहे. आणि धंदा हा धंद्यासारखाच करायचा आहे. आणि नेहमी नफा कमवत राहायचं. हे आपल्याला जमलं पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा