८. व्यापार उद्योग

८. व्यापार उद्योग

मंडळी तुमच्या नवीन धंद्याची सुरुवात व्यापारातूनच झाली पाहिजे. या उद्योगात आपण कमी रेटमध्ये म्हणजेच होलसेल रेटमध्ये माल किंवा सेवा खरेदी करायची आहे आणि बाजारभावाने ती विकायची आहे. या धंद्यात खरेदीची किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त असल्यामुळे किमतीमधील फरक हाच तुमचा फायदा असेल. सुरुवातीला हा नफा कमी असू शकतो पण धंद्यातील बारकावे तुमच्या लक्षात आल्यामुळे हळूहळू तुमच्या नफ्यात वाढ होईल.

नवीन धंद्याची सुरुवात व्यापारातून करण्याचे फायदे:

१. तुम्हाला ज्या वस्तूची किंवा सेवेचा उद्योग उभा करायचा आहे त्याचा व्यापार किंवा सेवेचा व्यापार तुम्हाला सुरु करता येईल.  

२. तुम्हाला त्या वस्तू किंवा सेवेच्या बाजारात घुसण्याचा हा एकदम सोपा मार्ग आहे. 

३. एकदा का तुम्ही बाजारात घुसला कि बाजारातील तुम्ही करू इच्छित असलेल्या धंद्याविषयी बारीक  सारीक सगळी माहिती तुमच्या समोर येईल. 

४. तुमच्या हेही ध्यानात येईल कि खरंच आपल्याला जो मोठा धंदा करायचा आहे त्या धंद्यात खरंच फायदा आहे कि नाही. जर त्या धंद्यात फायदा नसेल तर त्या धंद्याच्या तुम्ही नादी लागू नका.

५. आणि त्या धंद्यात खरंच नफा मिळत असेल तर १००% तुम्ही त्याचा व्यापार सुरु करा.

६. व्यापार करत असताना त्या वस्तूची आणि सेवेची चांगली बाजारपेठ शोधात राहा.

७. चांगल्या बाजारपेठेच्या जवळ तुम्ही राहायला सुद्धा जा जेणेकरून दररोजचा तुमचा प्रवासाचा वेळ वाचेल. 

८. व्यापार करताना तुमचा व्यवहार आणि हिशेब एकदम बरोबर ठेवा. 

९. व्यापारामुळे तुमच्या धंद्यातील एक गोष्ट समोर येईल ती म्हणजे तुमच्या आवडणाऱ्या वस्तू किंवा सेवेला बाजारात मागणी आहे कि नाही. चांगली मागणी असेल तर तुम्ही त्या वस्तूचे उत्पादन करायला सुरु करायचे आहे. मार्केट म्हणजेच बाजारपेठ तुमच्या हातात असल्यामुळे तुम्हाला तुमची वस्तू सहज खपवता येईल. म्हणजे तुम्हीच मार्केटचा राजा. 

एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल कि सेवेचा व्यापार कसा करायचा?

उत्तर समजून घ्या. सेवेचा व्यापार आपण एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुम्हाला विमा या सेवा उद्योगाचा व्यापार करायचा आहे तर तुम्ही सुरुवातीला एखाद्या कंपनीबरोबर एजंट म्हणून काम सुरु करा. एजंट म्हणजेच एक व्यापारी. तुम्हाला कमी रेटमध्ये विमा योजना विकत घ्यायची असते आणि जास्त किमतीत ती ग्राहकांना विकायची असते.

व्यापाराच्या धंद्यात तुम्ही स्वतः सुरुवातीला एकही रुपया गुंतवायचा नाही. धंदा सुरु करण्याच्या अगोदर तुम्ही तो नीट समजून घ्या. तुम्हाला स्पष्ट नफा दिसू लागला कि मग पैसे गुंतवून व्यापार सुरु करा. मंडळी मी स्वतः माझ्या स्वतःच्या अनेक धंद्यांची सुरुवात व्यापारातूनच केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

३. पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा

१. आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा

४. दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय सुरु करा